
Kahi Gappa, Kahi Goshti; G. A.'nchya Durmil Avajaat! (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 162 Min.
Sprecher: A Kulkarni, G
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
मराठीतले नामवंत साहित्यिक जी.ए. कुलकर्णी हे मनोव्यापाराची तात्विक मांडणी करणा-या गूढकथांसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या कथा वाचणे हा एक अलौकीक अनुभव असतो. त्याचमुळे मराठी साहित्यात जी.ए. कुलकर्णींच्या कथा वाचकांचा एक स्वतंत्र ...
मराठीतले नामवंत साहित्यिक जी.ए. कुलकर्णी हे मनोव्यापाराची तात्विक मांडणी करणा-या गूढकथांसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या कथा वाचणे हा एक अलौकीक अनुभव असतो. त्याचमुळे मराठी साहित्यात जी.ए. कुलकर्णींच्या कथा वाचकांचा एक स्वतंत्र वर्ग तयार झाला. आजही तरूण वाचकांना आकर्षित करणा-या कथा म्हणून त्यांचे स्थान कालातीत आहे. जी.ए. कुलकर्णींचे व्यक्तिमत्व गूढ म्हणून ओळखले जात असे. ते कधी सभा समारंभात दिसले नाहीत. त्यांच्या काळात ते कसे दिसतात हे अनेकांना माहित नव्हते त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक गूढ वलय तयार झाले होते. लेखक म्हणून असणारी कीर्ती आणि आपल्य खाजगी व्यक्तिमत्वाचे पैलू स्वतंत्र ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. ते आपल्या कथा आपल्या घरातील लहान मुलांना वाचून दाखवायचे. त्या काळात नव्याने आलेल्या टेपरेकॉर्डर या यंत्रावर त्यांनी आपल्या काही कथा मुलांसाठी रेकॉर्ड केल्या त्यामध्ये त्यांचा आवाज बंदीस्त झाला. या ऑडिओ रेकॉर्डेड कथा जी.ए. कुलकर्णी यांच्या भगिनी श्रीमती नंदा पैठणकर , जी.ए.कुलकर्णींचे अभ्यासक संजीव कुलकर्णी आणि अभिरूची ज्ञाते यांनी उपलब्ध करून दिल्या. जी.ए. कुलकर्णी यांचा आवाज कसा होता याचे संग्राह्य मोल लक्षात घेऊन आम्ही या कथा प्रकाशित करत आहोत. साध्या टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेल्या या ऑडिओ फाईल्सचा दर्जा सर्व रसिक समजून घेतील आणि जी.एंच्या आवाजाचे गूढ उलगडण्याकरता या कथा ऐकतील याची खात्री वाटते. धन्यावाद !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.