
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 72 Min.
Sprecher: Marathi, Storytel
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा...
बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (storytel.com/marathi) करा.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.